Sunday 10 September 2017

टिकेनंतर मेधा खोले यांनी तक्रार मागे घेतली

जात लपवून श्राद्ध विधीसाठी सोवळ्यातील स्वयंपाक केला म्हणून डॉ मेघा खोले यांनी केलेली तक्रार अखेर मागे घेतली.
पुणे- जात लपवून श्राद्ध विधीसाठी सोवळ्यातील स्वयंपाक केला म्हणून डॉ मेघा खोले यांनी एका स्वयंपाकी महिलेच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. चहुबाजूच्या टीकेनंतर डॉ मेघा खोले यांनी आपली तक्रार मागे घेतली.
डॉ. खोले यांच्या घरी काही धार्मिक कार्यासाठी ‘सोवळ्यातील’ स्वयंपाक करणारी सुवासिनी असलेली ब्राह्मण स्त्री हवी होती. २०१६ मध्ये मे महिन्यात त्यांच्याकडे निर्मला कुलकर्णी नावाची एक स्त्री आली होती. देवाच्या कार्यक्रमाचे स्वयंपाक करते असे सांगितले होते.
तिच्या माहितीवरुन खोले यांनी प्रत्यक्ष धायरी येथील तिच्या घरी जाऊन चौकशी करून त्या ब्राह्मण आहेत की नाही याची खात्री केली. त्यानंतर लगेचच निर्मला यांना घरच्या धार्मिक कार्याच्या स्वयंपाकासाठी बोलावले. दोन वर्षात त्यांनी एकूण सहा वेळा खोले यांच्या घरी स्वयंपाक केला.
दरम्यान, निर्मला या ब्राह्मण नसून मराठा असल्याचे खोले यांच्या गुरुजींनी त्यांना सांगितले. याबाबत खोले यांनी पुन्हा निर्मला यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी निर्मला यांनी त्यांचे नाव निर्मला यादव असल्याचे सांगितले.
त्यावेळी निर्मला यांना त्यांनी कुलकर्णी असे खोटे नाव का सांगितले, आमच्या घरी केवळा ब्राह्मण समाजातील सुवासिनी बाईने केलेलाच स्वयंपाक चालतो अशी विचारणा केली. यावरून निर्मला यांनी दमदाटी आणि शिवीगाळही केल्याची फिर्याद डॉ. खोले यांनी बुधवारी (६ सप्टेंबर) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिली होती.
त्यानंतर समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. त्यांच्या घरासमोर काही राजकीय संघटनांनीही आंदोलन केले. अखेर चहुबाजूच्या टीकेनंतर डॉ मेघा खोले यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात येऊन आपली तक्रार मागे घेतली आहे.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...