Monday 4 September 2017

‘नारायण राणे काँग्रेसमध्येच’

नारायण राणे अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. ते कोठे जातील असे वाटत नाही. तशी काही चर्चा नाही. त्यामुळे या विषयावर बोलणे योग्य नाही,’ असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

गणेशोत्सवाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी ते शनिवारी रात्री खडकीत आले होते. खडकीतील काही गणेश मंडळांना भेटी दिल्यानंतर, खडकीचे माजी उपाध्यक्ष, नगरसेवक मनीष आनंद यांनी आयोजित केलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी राणेंबाबत मोजक्या शब्दांत भाष्य केले.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, शहर युवक अध्यक्ष विकास लांडगे, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, कँटोन्मेंटच्या नगससेविका पूजा आनंद, वैशाली पहिलवान आदी या वेळी उपस्थित होते.


चव्हाण म्हणाले, विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही तयारी सुरू केली आहे. जिल्हा आणि शहरपातळीवर विविध स्तरावर बैठका सुरू आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा, तसेच त्यापूर्वीच्या निवडणुकांच्या पराभवाची कारणे शोधण्यात येत आहे. त्याचा अभ्यास केला जात आहे. त्यातून पुढची दिशा ठरवली जाणार आहे.’ मनीष आनंद यांनी चव्हाण यांचे स्वागत केले. पूजा आनंद यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...