पटवर्धन कुरोली, ता.१४: उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून मंजूर झालेल्या पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन पंचायत समिती चे माजी सभापती दिनकरराव नाईकनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. उजनीवसाहत येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून साडेसत्तावीस लाख रूपये मंजूर झाले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश उपासे, दादासाहेब साखरे, उजनी वसाहत च्या सरपंच सोनाली साखरे, ग्रामपंचायत सदस्य हरीदास मोरे, महादेव सावंत, राजेंद्र मगर,गोरख डोके, दत्तात्रय राऊत, राहुल सर्जे, योगेश भंडार, श्री.कवठेकर, भाजपाचे युवा नेते रमेश जवळेकर उपस्थित होते.

Comments
Post a Comment