राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षा 2025 . चा आदर्श शाळा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती पटवर्धन कुरोली शाळेला मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
मोहन कोळी : पटवर्धन कुरोलीजिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावला नाही. असा संदेश देणारी उपक्रमशील शाळा म्हणजे पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली केंद्र अंतर्गत येणारी चिंचकर वस्ती येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होय. या शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांद्वारे शिक्षणासाठी सतत अभिनव उपक्रम राबविले जातात. त्यामुळे ही शाळा शैक्षणिक दर्जासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रगण्य मानली जात आहेयेथे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबतच त्यांचे सामान्य ज्ञान, आवडी निवडी व छंद जोपासल्या जातात. त्याकरीता सामान्य ज्ञान स्पर्धा, ग्रामगीत संस्कृती ज्ञान परीक्षा, चित्रकला स्पर्धा इत्यादीचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न नागरिक घडवित आहे...
पटवर्धन कुरोली या गावापासून दीड ते दोन किमी अंतरावर गुडघाभर चिखल पार करून शाळेला जाणारे चिमुकली मुले पाहून मनाला खंत वाटायची. गावात येण्याकरिता व्यवस्थित रस्ता नव्हता. दररोज येथील लहान मुलांना पायपीट करत पटवर्धन कुरोली येथे शाळेत यावे लागत असे. या लहानग्यांची पायपीट बंद करावी त्यांची शाळेची सोय व्हावी म्हणून येथील भिकाजी अण्णा चिंचकर यांनी शाळा उभारण्यासाठी रस्त्याच्या लगत जागा दिली. जिल्हा परिषदे ने या ठिकाणी वस्ती शाळा मंजूर केली. पालकांच्या सहकार्याने शिक्षणाचे रोपटे लावणारा अवलिया म्हणजे श्री बोबडे सर. पगाराची मानधनाची अपेक्षा न करता मुलांना घडवत गेला आणि आज या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. हे शिक्षण रुपी रोपटे म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती होय. वस्तीवरील ग्रामस्थांच्या सहकार्याने हा प्रवास त्यांनी पूर्ण केला.आणि या प्रवासात त्यांना सध्या साथ लाभत आहे ती सहशिक्षक श्री. कैलास सोनवणे सर यांची. शाळा उभी करत असताना शाळेचा परिसर हा शोभिवंत असावा म्हणून शालेय परिसर परिसरात झाडे लावली व वाढवली.तसेच केंद्रातील इतर शाळांना पण झाडे तयार करून दिली .दरवर्षी शाळेत शेवगा, कडीपत्ता, आंबा इत्यादी रोपे तयार करून इतर शाळेला पुरवली जातात .पर्यावरण संरक्षण व सामाजिक बांधिलकी म्हणून असे विविध उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात.
शाळा सुशोभिकरण असेल वर्गसजावट, बोलक्या भिंती, पाढे पाठांतर, विविध सण, उत्सव, जयंती ,पुण्यतिथी या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास श्री कैलास सोनवणे सरांच्या माध्यमातून केला जातो.शालेय उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध नृत्य ,नाट्य, चित्रकला, हस्तकला, निबंधलेखन, कथाकथन, वक्तृत्व, नकला इत्यादीचे आयोजन शाळेत करून केंद्र स्तर, तालुकास्तर, जिल्हास्तरावर सहभाग घेतला जातो.शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, लंगडी, आट्यापाट्या, विटीदांडू, धावणे, लंगडी, उंचउडी या खेळ प्रकारातही विद्यार्थ्यांनी सहभाग व यश प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या दृष्टीने अध्यापनामध्ये संगणकावर पाठ दाखवून अध्यापन मोबाइलवर खेळ यांचा अध्यापनात उपयोग करून अध्ययन अध्यापन प्रभावी केले जाते .मनोरंजनात्मक अध्यापन होण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्न करणारे श्री. बोबडे सर व श्री. सोनवणे सर यांना मार्गदर्शन करणारे केंद्रप्रमुख श्री दशरथ मोरे साहेब गटशिक्षणाधिकारी श्री मारुती लिगाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाने शालेय गुणवत्तेचा आलेख उंचावत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती पटवर्धन कुरोली शाळेच्या विदयार्थ्यांचे ए टी एस परीक्षेत यश
1) नाईकनवरे श्रेयस सोमनाथ. इयत्ता 3 री.
केंद्रात 4 वा क्रमांक
2) शिकलकर सारा नौशाद .इयत्ता 3 री
केंद्रात 5 वा क्रमांक
3) नाईकनवरे पूर्वा नवनाथ .इयत्ता 3 री
केंद्रात 5 वा क्रमांक
4) नाईकनवरे कार्तिकी विशाल. इयत्ता 1 ली
केंद्रात 1 ला क्रमांक
*यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक धनाजी बोबडे म्हणाले की पंढरपूर पासून 27 किमी वर हे गाव असून या शाळेच्या आजूबाजुच्या गावात अनेक इंग्लिश मेडियमच्या शाळा आहेत .ग्रामस्थांचा सर्व व्यवहार , संस्कृती ही शहराशी सलग्न आहे .यामुळे आपल्या गावातील शाळा ही अशीच असावी अश्या पालकांच्या अपेक्षा जाणवल्या.या अपेक्षेस पात्र होण्याचे आम्ही ठरवले आणि त्या दृष्टीनी शाळेची वाटचाल सुरु केली*
.



Comments
Post a Comment