Saturday 4 September 2021

पटवर्धन कुरोली येथे ग्रामीण कृषी जागृकता कार्यक्रम

 


पटवर्धन कुरोली दि.२७ जुलै-

(प्रतिनिधी) कोरोना च्या पार्श्वभूमीवर कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषी विद्यार्थी आहे त्या मूळ ठिकाणी कार्यरत आहेत याच माध्यमातून धुळे येथील कृषी महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु.नाईकनवरे प्रिती लक्ष्मण, पटवर्धन कुरोली तालुका पंढरपूर येथील शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रण कसे बनवायचे व त्याचे फायदे काय आहेत याबाबत माहिती दिली.

त्या म्हणाल्या-'सध्याच्या वातावरणामुळे द्राक्ष व डाळिंब वर मोठ्या प्रमाणात तेल्या व दावण्यारोग यांचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे'.  कृषी विद्यार्थीनी प्रिती नाईकनवरे यांनी कमी खर्चा मध्ये या रोगावर उपाय म्हणून बोर्डो मिश्रण कसे बनवावे हे गावकऱ्यांना सविस्तर पणे सांगितले.

यावेळी त्यांनी सांगितले की १०० लिटर बोडों मिश्रण बनवण्यासाठी एक किलो मसूद हे ५० लिटर पाण्यामध्ये विरघळावे आणि एक किलो चुन्याचे खडे (प्रमाण १:१) किंवा पावडर असेल तर ती ४०० ग्रॅम एवढी घेऊन पन्नास लिटर पाण्यामध्ये ओतावे हे दोन्ही मिक्स करत असताना त्या मिश्रणाचा pH हा ७(सात) आला पाहिजे याची काळजी घ्यावी.जे मिश्रण तयार झाले आहे. तो द्राक्ष वरील दावण्या व भुरी या रोगासाठी फवारली तरी असे आढळून येईल की द्राक्ष वरील रोग कमी होतात, याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले.

तिला महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सी. डी. देवकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. संदीप पाटील, कार्यक्रम अधिकारी ए. एस. महाले व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन व लाभले असेही प्रिती नाईकनवरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...