पिराची कुरोली येथे गणेश मशिनरी चे उदघाटन

पटवर्धन कुरोली, ता, 03: पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथील पिराची कुरोली फाटा येथे गणेश मशीनरी या दुकानाचा भव्य उद्घाटन समारंभ माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभ हस्ते पारपडला.



 यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी आणि मित्रपरिवाराने गणेश मशिनरी या  दुकानाच्या उद्घाटन समारंभास भेट देऊन वसंतराव गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या. विविध प्रकारच्या व्हरायटी या दुकानात उपलब्ध असून पिराची कुरोली भागातील शेतकऱ्यांनी एकवेळ अवश्य भेट द्यावे असेही आवाहन वसंत नाना गायकवाड यांनी केले आहे. यावेळी विजय मंगळवेढेकर, राजकुमार जेठे, गंगाराम विभुते,   मच्छिन्द्र सावंत, उद्धव कौलगे, तुकाराम कौलगे, ज्ञानेश्वर सावंत, हनुमंत कौलगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments