एस.पी.पब्लिक स्कूलच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा - पटवर्धन कुरोली,ता. ०२: दि. 01/09/2017 रोजी महाराष्ट्र राज्य क्रिडा विभागाअंतर्गत पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धामध्ये एस.पी. पब्लिक स्कूल , नांदोरेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून 6 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धासाठी प्रवेश निश्चित केला. यामध्ये 22 ते 26 किलो वजन गटातून वैष्णवी पांडूरंग पवार हिने तालुक्यामध्ये प्रथम,38 ते 42 वजन गटातून आकांक्षा बबन सावंत हिने प्रथम ,30 ते 35 किलो वजन गटातून श्रेयश युवराज सातुरे याने प्रथम ,35 ते 40 किलो वजन गटातून प्रितम चांगदेव करांडे याने प्रथम व 35 ते 40 किलो वजन गटातून मुलींमधून स्नेहा संजय काळे हिने व्दितीय क्रमांक तसेच 35 ते 40 किलो वजन गटातून संकेत विठ्ठल सातुरे याने तालुक्यामध्ये व्दितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. यशस्वी विदयार्थ्यांना कराटे प्रशिक्षक दिपक माने सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .

Comments
Post a Comment