पिराची कुरोली त आट्यापाट्या स्पर्धा

पटवर्धन कुरोली,ता. ०३: पिराची कुरोली (ता.पंढरपूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या आट्यापाट्या स्पर्धेत पांडूरंग आट्यापाट्या संघ नांदोरे या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे येथील गणेश आट्यापाट्या संघाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पंढरपूर, मंगळवेढा,माढा,माळशिरस, इंदापूर तालुक्यातील ४० संघानी सहभाग नोंदविला. श्रीकृष्ण तालीम मंडळ शिरढोण संघाने द्वितीय, अप्पासाहेब इनामदार पंधरा सेक्शन संघाने तृतीय,जय हनुमान गादेगाव संघाने चॊथा तर श्रीकृष्ण शिरढोण ब संघाने पाचवा क्रमांक पटकाविला. स्पर्धा यशस्वी पणे पार पाडण्यासाठी गणेश आट्यापाट्या संघ व ग्रामस्थानी परिश्रम घेतले.


Comments