उजनी धरण १०७ टक्के

उजनी धरण १०७ टक्केवर
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने आज सायंकाळी ६ वाजता १०७ टक्क्यांची पातळी गाठली असून सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने वरील धरणातील विसर्ग मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
उजनी धरणाने यंदा लवकरच शंभरी गाठल्याने जिल्ह्यावासियांमध्ये  समाधानाचे वातावरण आहे. पावसाची अद्याप दोन नक्षत्रे बाकी असल्याने अजूनही पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र मागील आठवड्यात  सूर गवसलेल्या वरुणराजाने सध्या विश्रांती घेतल्याने उजनी धरण क्षेत्रातील आवक कमालीची घटली आहे. आज सायंकाळी उजनी धरणात दौड येथून अवघा ९ हजार ८४५ क्युसेक्स पाण्याच्या प्रवाह येत आहे. तर बंडगार्डन येथे ६ हजार ५९२ क्युसेक्स प्रवाह भीमा नदीत मिसळत आहे.


उजनी धरण पाणी पातळी
शनिवार २ सप्टेंबर २०१७    सायं. ६ वाजता.
पाणी पातळी : ४९७. १३०
एकूण साठा : ३४२१. ९२
उपयुक्त साठा : १६१९. ११
टक्केवारी :१०६. ७२

कालवा  विसर्ग : ३,००० क्युसेक्स
बोगदा विसर्ग : ९०० क्युसेक्स
वीजनिर्मिती : १,५०० क्युसेक्स

दौड विसर्ग : ९,८४५ क्युसेक्स
बंडगार्डन विसर्ग : ६,५९२ क्युसेक्स

Comments

Post a Comment