करकंब जवळ अपघात बावीस भाविक जखमी

करकंब जवळ अपघात.                                                                                        

करकंब,ता.२- एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेवून पिकअपमधून पंढरपूरहून कर्जतकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या पिकअपला करकंब येथील पांडूरंग पेट्रोल पंपाजवळ दुसऱ्या जीपने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात बावीस भाविक जखमी झाले आहेत हदगाव (ता.कर्जत, जि.नगर) येथिल भाविकांना घेवून एमएच.४५.६७६२ हा पिकअप पंढरपूरला आला होता. आज एकादशीचे विठ्ठलाचे दर्शन घेवून माघारी जात असताना रात्री साडेआठच्या सुमारास करकंबजवळ एमएच १३ एसी ७३८६ या महिंद्रा जीपने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पिकअप पलटी होवून त्यातील २२ भाविक जखमी झाले तर महिंद्रा जीपचा चालकही गंभीर जखमी झाला आहे. घटना घडताच त्या ठिकाणी सुनिल झिरपे, ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, गणेश साळुंखे, फिरोज कोरबू, दत्तात्रय खारे, आदी युवकांनी धाव घेवून तातडीने जखमींना करकंबमधील खासगी आणि शासकिय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी बळीराम आटुळे, एकनाथ आटुळे, हनमंत आटुळे, दत्तात्रय आटुळे, सुभद्रा आटुळे, रंजना राऊत (सर्वजण रा.हदगाव, ता.कर्जत), राजू गायकवाड (रा.करकंब, ता.पंढरपूर) यांच्यावर करकंब येथील जगताप हॉस्पिटमध्ये उपचार चालू आहेत. तर भाग्यश्री आटुळे, छाया आटुळे, रोहिणी गावडे, मिरा आटुळे, लक्ष्मी आनचरे, सविता शेटे, जनाबाई गावडे, पुष्कर गावडे, लता आटुळे, पुष्पा गावडे, आत्याबाई आटुळे, जनाबाई गावडे, ज्ञानेश्वर गाढवे, योगिराज रोटे, बळीराम आटुळे, मच्छिंद्र आटुळे (सर्वजण रा.हदगाव, ता.कर्जत) या जखमीवंर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची खबर मिळताच करकंब पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य चालू केले पण करकंब ग्राणीण रुग्णालयात मात्र 'येरे माझ्या मागल्या' या उक्तीप्रमाणे एकही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हता. उपस्थित असणाऱ्या दोन नर्सची जखमींना टाके घेताना आणि प्लॅस्टर करताना तारांबळ उडत होती. सरपंच आदिनाथ देशमूख यांच्यासह अनेक उपस्थितांनी वारंवार फोनवरुन संपर्क साधल्यानंतरही वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनेचे गांभिर्य लक्षात येत नव्हते. काही गंभीर रुग्णांना पंढरपूरला पाठवणे आवश्यक असताना रुग्णवाहिकाही जाग्यावर नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा येथील ग्रामीण रुग्णालयाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. .....



.

Comments

Post a Comment