विद्यार्थी शिक्षक दिन साजरा

पटवर्धन कुरोली,ता.१८: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील पटवर्धन कुरोली प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी चे प्रशालेचे कामकाज इयत्त्ता बारावी सायन्स च्या विद्यार्थ्यांनी पाहिले. विद्यार्थी प्राचार्य म्हणुन कोमल झांबरे तर उपप्राचार्य म्हणून ऋतुजा पाटील काम पाहिले. यानंतर विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले. यावेळी प्रभारी प्राचार्य सुधाकर जाधव, पर्यवेक्षक हनुमंत लामकाने उपस्थित होते. सुत्रसंचालन संजीवनी तवटे यांनी केले.

Comments