Friday 17 November 2017

पटवर्धन कुरोली प्रशालेत कार्यशाळा

पटवर्धन कुरोली,ता.१७:पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील  पटवर्धन कुरोली प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय,पटवर्ध कुरोली येथे  "शिक्षक हो  तंत्र स्नेही बनुया" ही कार्यशाळा घेण्यात आली
   मुलांना अवघड वाटणारे विषय इ लर्निंग च्या माध्यमातून कसे सोपे करावेत, मोबाईल चा वापर शैक्षणिक साधन म्हणून कसा करावा,शैक्षणिक ऍप कोणते,ते वापरून आनंददायी शिक्षण कसे द्यावे ,प्रोजेकटर कसा हाताळावा. तो मोबाईलशी कसा कनेक्ट करावा,नवोदय, स्कॉलरशिप समबंधी अभ्यासक्रम व चाचणी संबंधी  माहिती देण्यात आली , शेवटी  वसंत हंकारे ,आय ए एस अन्सार शेख,सोलापूर चे सी इ ओ मा राजेंद्रजी भारुड यांचे संपादित  मोटिव्हेशनल स्पीच दाखवण्यात आले  कार्यक्रमाचा शेवट  ध्यान साधनेने करण्यात आला ,मार्गदर्शक म्हणून एन डी देशमुख यांनी तर तांत्रिक साहाय्य प्रा,अमोल नाईकनवरे प्रा सतीश बाबर यांनी केले सदर प्रसंगी प्रभारी प्राचार्य सुधाकर जाधव ,पर्यवेक्षक हनुमंत लांमकाने  सर्व स्टाफ उपस्थित होता.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...