Thursday 15 February 2018

अवैध दारू प्रतिबंध समिती सदस्यपदी शैला गोडसे


सोलापूर जिल्हा अवैध दारू प्रतिबंध समितीच्या महिला सदस्यपदी जि.प. सदस्या शैला गोडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर कार्यकारी अध्यक्ष जिल्हा पोलीस प्रमुख असणार आहेत.
निवडीचे पत्र जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहे. जिल्हा दारू प्रतिबंध समिती यासाठी राज्यस्तरावर मंत्री, राज्य उत्पादन शुल्क यांच्या अध्यक्षतेखाली त्या त्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिट्यांचे गठण करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार सोलापूर जिल्हा प्रतिबंध समितीचेही गठण झाले आहे. जिल्हा परिषदेमार्फत दोन महिला सदस्यांची नावे या समितीत असून यामध्ये शैला गोडसे यांचेही नाव आहे. ही शिफारस जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे यांनी केली होती.
या समितीमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जि.प. मुख्य कार्यकार अधिकारी, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती, व्यसनमुक्त संस्था प्रतिनिधी, पोलीस उपअधिक्षक, विशेष समाज कल्याण अधिकारी, जिल्हा अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क हे सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
या समितीमार्फत अवैध दारू विक्रीबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेणे, पोलीस विभागाने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत केलेल्या कारवाईचा आढावा घेणे, ग्रामसुरक्षा दल, महाराष्टÑ पोलीस अधिनियम हद्दपारी याविषयीचा आढावा घेणे, शांतता भंग करणे, गुन्हेगारी कृत्य करणे यावर प्रतिबंध घालण्यासाठी आढावा घेणे, तालुकास्तरीय तहसीलदार, दारू विक्री प्रतिबंध करताना कामगिरीचा आढावा घेणे आदी विषय या समितीमार्फत आढावा घेण्यात येणार आहे.
शैला गोडसे यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Attachments area

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...