Thursday 21 June 2018

एस.पी.पब्लिक स्कूलमध्ये योगदिन

नांदोरे.ता. पंढरपूर येथील एस.पी. पब्लिक स्कूल, नांदोरे येथे आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी मेजर किरण पाटील (नेवरे ) यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व सांगून सर्व योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविलेकरो योग, रहो निरोग’ या म्हणी प्रमाणे योगाचे महत्त्व पटवून दिले. मुळची भारतीय असणारी योग पद्धती ही संपूर्ण विश्वाने सर्वोत्तम जीवन पद्धती म्हणून अंगीकारली आहे, तसेच आपणही आपले आरोग्य उत्तम ठेवण्याकरिता नियमित योगासने केली पाहिजेत, असे सांगितले यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे,आव्हे वि.का. सोसायटीचे चेअरTमन राणू पाटील, प्रविण खळगे, नवनाथ पवार ( खेडभोसे), प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होत.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...