पटवर्धन कुरोली, ता.२७: पंढरपूर येथील महर्षी वाल्मीकी जयंती महोत्सवानिमीत्त महर्षी वाल्मीकी कर्मचारी मंडळ  यांच्या वतीने रविवार (ता.२८)रोजी सायंकाळी सहा वाजता  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  इसबावी येथील विसावा मंदिरा शेजारील बाळकृष्ण महाराज फणसेकर मठात होणार्या या कार्यक्रमात यावेळी कोळी समाजातील गुणवंत विद्यार्थी, सेवाभावी सेवक व सेवानिवृत्त कर्मचार्याचा सत्कार करण्यात येणार आहे. आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते व माजी नगरसेवक गणेश अधटराव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.

Comments