Wednesday 29 May 2019


पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर)  येथील माजी सरपंच महादेव उपासे यांच्या निधनानंतर  तिसऱ्याच दिवशी भावकीचे सुतक फेडुन मराठा समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे.

अंत्यसंस्कारानंतर भावकीतील लोकांना दहा दिवस सुतक पाळावे लागते. यामुळे भावकीतील लोकांना दहा दिवस  गावातील किंवा पाहुणे मंडळींच्या शुभ कार्यात सहभागी होता येत नाही, सण समारंभ साजरे करता येत नाही. मराठा समाजातच फक्त एवढे जादा दिवस सुतक पाळले जाते. त्यामुळे भावकीतील लोकांना दहा दिवस  विनाकारण त्रास सोसावा लागतो

 पटवर्धन कुरोली येथे लोकसंख्येच्या चाळीस टक्के उपासेची भावकी आहे.  भावकीतील लोकांना  गावातील व पाहुणे मंडळींच्या शुभ कार्यात सहभागी होता यावे, सण समारंभ साजरे करता यावेत यासाठी उपासे कुटूंबियांनी  तिसऱ्याच दिवशी भावकीचे सुतक संपविण्याचा  निर्णय  घेतला. तसा निर्णय सर्व भावकीतील लोकांना कळवला. 

या कृतीचा सर्व मराठा समाज बांधवांनी आदर्श घ्यावा व  जुन्या रूढी व परंपरा यांना फाटा देऊन, भविष्याचा वेध  घेत आदर्श पद्धतीचा जीवनात अवलंब करावा व मराठा समाजाची प्रगती साधावी. प्रत्येक आत्मा हा पवित्रच आहे मग निधनानंतर त्याच्यासाठी सुतक का पाळायचे ? अशा भावना व्यक्त केल्या.त्यांच्या या कृतीचे सर्व नातेवाईकांनी कॊतुक करून मराठा समाजातील प्रत्येकाने जा आदर्श घ्यावा अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत  अनेक वेळा मराठा समाजातील सुधारणावाद्यांनी सुतक तीन दिवसात सम्पवणे,  या नुसार हा महत्वाचा  व इतरांना अनुकरणीय निर्णय घेतल्याने याचे समाजातून स्वागत होत आहे,


No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...