पटवर्धन कुरोली, ता.०९: पिराची कुरोली (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भालके-काळे गटाला धोबिपिछाड देत परिचारक गटाने बाजी मारली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी असलेल्या प्रभाग क्रमांक पाचचे ग्रामपंचायत सदस्य भालके-काळे गटाचे आलम शेख यांचे सदसत्व जातपडताळणी मुळे रद्द झाले होते. त्या जागी झालेल्या पोटनिवडनुकीत सत्ताधारी आमदार भालके-काळे-आमदार शिंदे गटाकडुन सज्जत उस्मान मुजावर तर परिचारक गटाकडुन कृष्णा विठ्ठल भोई या दोघात सरळ लढत झाली. यामध्ये परिचारक गटांचे भोइ यांना 264 तर भालके -काळे-शिंदे गटाचे मुजावर यांना 241 तर नोटाला 1मत मिळाली. सत्ताधारी भालके -काळे गटाच्या हक्काच्या जागेवर परिचारक गटाचा उमेदवार विजयी झाल्याने भालके-काळे गटाला धक्का मानला जात आहे. परिचारक गटाचा उमेदवार विजयी झाल्याचे जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला. विजयी उमरदवार भोई यांचा माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उध्दव कॊलगे, ज्ञानेश्वर सावंत, वसंतराव गायकवाड

Comments
Post a Comment